थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस
अपघात कश्यामुळे झाला अद्याप अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (३ एप्रिल २०२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक ईरटीका कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. यावेळी गाडीत एकूण ९ जण होते. ईरटीका गाडीसह गाडीतील नऊ जण विहिरीत कोसळले आणि ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर NDRF, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते. मात्र विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. अद्याप कश्यामुळे अपघात झाला हे स्पष्ट झालेले नाही आहे.
कार्यक्रमातून परतत असतांना अपघात
या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाता मागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अपघातातील मृत हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समजते आहे. मृतांमध्ये दरगोडे कुटुंबातील सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे अशा एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा व इतर 4 नातेवाईक असे एकूण नऊ जण होते. एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमावरून परतत असतांना हा अपघात घडला.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
Ans: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे.
Ans: एकूण 9 जणांचा मृत्यू झाला.
Ans: कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






