MURDER (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
पिंपरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हि घटना चिखलीतील कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव महेश चामे (रा. नवचैतन्य सोसायटी, चिखली, मूळ लातूर) असे आहे.
जुन्या वादातून एकाच्या हत्येचा प्रयत्न; पोलिसांना खबर लागली अन् मोठा अनर्थ टळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हे मोबाईल स्क्रीन गार्ड विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते रस्त्यालगत दुकान लावायचे. गुरुवारी
सकाळी कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. महेश गंभीर जखमी असल्याचे समोर आले. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महेश यांचा धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहेत. हा खून कोणी केला, का केला याचा तपास सुरु असल्याचे पोलीस उपयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. तसेच, आरोपींबाबबत माहिती मिळाली असून, पोलीस त्यांच्या मागावर असल्याचेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पालघर हादरलं! पोटच्या मुलाला आधी संपवलं मग स्वतः देखील आत्महत्या केली…
एका वडिलांनीच आपल्या पोटच्या पोराची हत्या केली नंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना पालघरच्या जव्हार तालुक्यातून समोर आली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय १५) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे तर शरद रघुनाथ भोये ( वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.
आदित्यचे आजोबा रघुनाथ हे त्यांच्या पिंपळशेत होळीचे माळी येथील त्यांचा शेतावरील घरी गेले होते. त्यावेळी त्याचा १५ वर्षाचा नात भावेशचा नातू भावेशचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली.
पोलिसांना माहिती मिळताच काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत अधिक तपास करत आहे. शरद भोये यांनी मुलाची हत्या नेमकी का केली? याचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला देशप्रेमींना दिला चोप;रत्नागिरीतील प्रकार