वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वाढदिवसाच्या पार्टीत क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव आकाश पवार असे आहे. तर, मनोज पांडे (37 वर्ष) आणि राहुल भुरकुंड (27 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय प्रकरण?
पापडी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा वाढदिवस होता. त्यावेळी हे मित्र एका मोकळ्या जागेत पार्टीसाठी बसले होते. ओल्या पार्टीत सर्वच गुंग होते. त्यावेळी काही वेळात त्यांच्यात आपसातच क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाला. या मित्रंपैकी मनोज पांडे याने आकाश पवार आणि राहुल भुरकुंड यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. त्याचवेळी त्या दोघांनीही जखमी अवस्थेत आरोपी मनोज पांडेवर देखील वार केले.
त्यानंतर जखमींना उपचारासाठी बंगाली येथील कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आकाश याच्या पोटात चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इतर आरोपी मनोज पांडे आणि राहुल भुरकुंड या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्वामींच्या मठात रात्री आढळली महिला; ग्रामस्थांचा संताप, मठातून हकालपट्टी
पतीने चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; मृतदेह गाठोड्यात झाकला अन्…
साताऱ्यात चारित्र्याचा सतत संशय घेणाऱ्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. ही घटना मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आली. याप्रकरणी मेहुणा श्रेयस अनिल कुमार पाटील (वय २०, मेहर देशमुख कॉलनी करंजे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२, रा. मंगळवार पेठ, मूळ राहणार पानमळेवाडी पोस्ट, वर्ये तालुका, सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, रा मंगळवार पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. मेहुण्याशी धक्काबुक्की होऊन जखमी झालेल्या संशयिताला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा राजीव नवले व पोलिस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली
आरोपी राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून, त्याला दारूचे व्यसन होते. शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. नवरा-बायकोमध्ये पुन्हा भांडण झाले. याची कल्पना अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती. त्यातच नराधम पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर २० जूनला सकाळी त्यांचा मृतदेह घरातील कॉटच्या खाली कपड्याच्या गाठोड्याने झाकलेल्या स्थितीत आढळून आला.यावेळी फिर्यादी श्रेयस पाटील व राजेंद्र शिंदे यांच्यात धक्काबुक्की होऊन शिंदे जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोटार पुढे नेण्याच्या वादातून हाणामारी; गुन्हा दाखल