संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात सायबर चोरटे नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडूनही केले जात आहे. मात्र घटना काही कमी होतांना दिसून येत नाही. याबाबत ग्लोबल सायबर क्राईम राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. धनंजय देशपांडे यांनी ऑनलाईन सायबर क्राईम धोके आणि सावधानता’ या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. मैत्र जीवांचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या एक वर्षांमध्ये ऑनलाईनद्वारे २८० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील निव्वळ दोन कोटी रुपये अर्थात ०.७% रक्कम प्राप्त झाली असून फसवणुकीमध्ये बळी पडलेल्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांना याबाबत मार्गदर्शन होणे काळाची गरज बनले असून, याबद्दल त्यांनी आपले मत मांडले.
देशपांडे यांनी नागरिकांना खालीलप्रमाणे सल्ले दिले आहेत
कार्यक्रमाचे आयोजन मैत्र जीवांचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव स्वप्नील दुधाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्य डॉक्टर भालचंद्र कापडेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.