संग्रहित फोटो
विनायक नागनाथ गायकवाड ( वय २१, रा उंड्री रोड पिसोळी), विजय उर्फ चाँद राजु काळे (वय ३०, रा भालेकर नगर), जॉन जोसक जाधव (वय ४० जुनी सांगवी), विशाल कृष्णा गांधिले (वय ४७,रा. पॅनकार्ड रोड बाणेर) निसर्ग अर्जुन गांधिले (वय. ३७,रा. ऋतुजा पार्क बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अभय सुरेश ससाणे (रा. श्रीरामपुर, अहिल्यानगर ) हा फरार असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, उपनिरीक्षक गौरव देव, कर्मचारी दिलीप गोरे, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीपैकी विशाल गांधीले याचे एका व्यक्तीसोबत वाद झाले होते. त्या कारणातून त्याने हे पिस्तूल स्वसंरक्षणासाठी खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. गांधीले हा एका पक्षाचे काम करतो. तो महापालिकेच्या निवडणूकीत इच्छुक उमेदवार होता. दरम्यान गायकवाडने विक्री करण्यासाठी गावठी पिस्तूल श्रीरामपूर अहिल्यानगर येथील ससाणे याच्याकडून खरेदी केले. नंतर ते पिस्तूल त्याने काळे आणि जाधव याच्या मार्फत गांधिले याला विक्री केले. ४५ हजार रुपयात हे पिस्तूल गांधिलेने विकत घेतले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना या पिस्तूलाची खबर मिळाली. त्यांनी विशाल गांधिले याच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या.
असे अडकले जाळ्यात
पोलिस कर्मचारी जगदाळे यांना हे पिस्तूल गायकवाड याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने सांगितले ते पिस्तूल विजय उर्फ चाँदला विक्री केले. त्याला पकडताच त्याने जॉन उर्फ रिंक्या जाधव याला दिल्याचे सांगितले. त्याच्या चौकशीत त्याने विशाल गांधिलेला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी आपला मोर्चा गांधिलेकडे वळविला. त्याला बाणेर परिसरातून ताब्यात घेतले. त्याने हे पिस्तूल निसर्ग गांधिले याच्याकडे ठेवले होते. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली.






