चिमुकली शरीरांच्या आजराने ग्रस्त
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव छाया आदिनाथ देवडकर(२८) असे आहे. तर चिमुकलीचा नाव शारवी आदिनाथ देवडकर (२ वर्ष ३ महिने) असे आहे. आदिनाथ देवडकर, त्यांची पत्नी छाया आणि मुलगी शारवी हे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास आहेत. शारवी हाडांच्या आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. मुलीला झालेल्या आजारामुळे छाया नैराश्यात गेली होती. यामुळेच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
हातपाय चिकटपट्टीने बांधले…
शुक्रवारी (दि. २) पती आदिनाथ कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते कामावरून घरी आले. तेव्हा शारवी घरातील पाळण्यात निपचित पडली होती. तिचे हात-पाय चिकटपट्टीने बांधण्यात आलेले होते. पत्नी छायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर घाबरलेल्या आदिनाथ यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच एसीपी शीतल जानवे, पोलिस निरीक्षक धेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासणीत उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी छाया देवडकर हिच्याविरोधात मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात.
Ans: शारवी आदिनाथ देवडकर (२) आणि आई छाया देवडकर (२८).
Ans: मुलीच्या दीर्घ आजारामुळे आलेल्या नैराश्यातून आईने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.






