उत्पन्न वाढीसाठी पुणे महापालिका 'अॅक्शन मोड'वर; मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता 'टार्गेट'
Pune Municipal Corporation: पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग केल्या प्रकरणी भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम असे या भाजप नेत्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात संबंधित महिला अधिकारी कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ओंकार कदम सातत्याने त्यांच्या विभागात येत होता. अनेकदा त्याने महिला अधिकाऱ्याला शिवीगळही केली. त्यांच्या संमतीशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड केले. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ओंकार कदमविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कदमला पुणे महापालिकेत प्रवेश बंदीही करण्यात आली होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली. त्यांतर आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे, आणि विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसेच याप्रकरणात यापूर्वीच कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुरेशा पोलिस बंदोबस्ताअभावी महापालिकेच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई असतानाही ओंकार कदम तिथे सातत्याने का येत-जात होता.
महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्याविराेधात भाजपचे वरीष्ठ नेते कारवाई का करीत नाही ? असा प्रश्नही सातत्याने उपस्थित केला जात होता. ओंकार कदमविरोधात महापालिकेच्या सुरक्षा विभागानेही पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच सदर महीलेने राज्य महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. आयोगाकडे तक्रार करण्यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. पण पक्षाकडून त्याच्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही.
दरम्यान, भाजपच्या एका आघाडीचा शहराध्यक्ष दहा ते पंधरा कार्यकर्त्यंसोबत महापालिका भवनात येतो. अनेकवेळा महापालिकेच्या प्रवेशद्वारापासूनच हे लोक घोषणाबाजी करत आणि गोंधळ घालत महापालिकेत प्रवेश करतात. हा पदाधिकारी जमाव घेऊन महापालिकेतील विविध विभागात जातो. त्याठिकाणी माहिती मागतो आणि आताच्या आताच माहिती पाहिजे म्हणून कार्यालयात किंवा दरवाजात ठिय्या मारून घोषणाबाजी करतो, यामुळे आतील व्यक्तीला बाहेर येता येत नाही आणि बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाता येत नाही. दुसरीकडे त्याचे कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीचे चित्रीकरण करत राहतात. या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिकेच्या सुरक्षा विभागाने शिवाजीनगर पोलिस संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई कऱण्याची अशी मागणी या पत्राद्वारे केली होती.
महिला अधिकाऱ्याने जानेवारी महिन्यात या पदाधिकाऱ्याविरोधात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महिला तक्रार निवारण समितीकडे आणि महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. महिला अधिकाऱ्याच्या या तक्रारीनंतर अखेर आज त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.