csmt(फोटो सौजन्य- पिंटरेस्ट)
उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानके आणि टर्मिनसमध्ये एकापेक्षा जास्त एन्ट्री आणि एक्झीट आहेत. या चोरवाटांद्वारे प्रवासी स्थानकात ये-जा करतात. खासकरुन विना तिकिट प्रवासी या चोरवांटाद्वारे प्रवास करतात. या चोरवाटांमुळे टर्मिनसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सीएसएमटी, एलटीटी, दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे अशा सर्व टर्मिनसमध्ये चोरवाटा असल्याने त्या तातडीने बंद करण्याची आवश्यकता आहे.
Tiger Memon Asset : टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकारला सोपवा- मुंबई विशेष न्यायालयाचे आदेश
मुंबईत उपनगरीय रेल्वे स्थानकांसह लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसची वाहतूक टर्मिनसमधून होते. दररोज सुमारे लाखो प्रवासी टर्मिनसहून ये-जा करतात. टर्मिनसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारवगळता अन्य मार्गाने प्रवासी ये-जा करतात. अशा मार्गाना चोरवाटा असे म्हटले जाते. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतीही तजवीज नसते. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक, स्कॅनर अशी व्यवस्था असते. मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातच तिकीट तपासणीसही उभे असतात.
मुंबईच्या रेल्वे हद्दीतील एकूण गुन्ह्यांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक गुन्हे रेल्वे स्थानक टर्मिनसमध्ये होतात. रेल्वे हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफवर आहे. लोहमार्ग पोलिस , आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाने सुरक्षित प्रवासासाठी या चोरवाटा बंद करण्यासाठी भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भिंतीही उभारल्या. मात्र, काही दिवसानंतर स्थानिक नागरिकांनी भिंतीला भगदाड पडल्याचे निदर्शनास येते.
रोजचे प्रवासी असे
■ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सुमारे ११.५० लाख
■ लोकमान्य टिळक टर्मिनस- सुमारे ७० हजार
■ दादर – सुमारे २ लाख
■ मुंबई सेंट्रल – सुमारे २ लाख
■ वांद्रे टर्मिनस – सुमारे २० हजार
विशेष व्यवस्था हवी
टर्मिनसमध्ये रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत रेल्वे गाड्यांची वर्दळ असते. टर्मिनस परिसरात फेरीवाले आणि गर्दुल्ले यांचा वावर असल्याने, रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होते. स्थानक व टर्मिनसमध्ये वावरणारे गर्दुल्ले, फेरीवाल्यांकडून प्रवाशांवर हल्ले झाल्याची नोंद आहे. यामुळे टर्मिनसच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटना करीत आहेत.
■ टर्मिनसमधील स्कॅनरमधून नियमित तपासणी नाही
■ गुन्हेगारांचा विनातिकीट रेल्वे स्थानकांत वावर
■ रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलात
■ अपुरे मनुष्यबळ, महाराष्ट्र सुरक्षा दल, होमगार्ड अशा यंत्रणांच्या मदतीने प्रवाशांची सुरक्षा