कसा झाला अपघात?
जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असतांना, खेडशी परिसरामध्ये पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि वेगवान डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरच्या थेट खाली आली.
डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यामुळे, डंपर रस्त्याच्या खाली कोसळत असताना ती महिलाही डंपरच्या खालीच दबली गेली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
वाहतूक विस्कळीत
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, डंपर महामार्गावरून खाली कोसळल्याने आणि मोठी गर्दी जमल्याने हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
आणखी एक अपघात
धक्कादायक म्हणजे जिथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला त्याच ठिकाणी काही वेळेपूर्वीच एका रिक्षाचाही अपघात झाला होता. त्यामुळे हा परिसर आज सकाळी अपघाताचे केंद्र बनला होता. या घटनेमुळे संपूर्ण जाकादेवी आणि खेडशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आंबेगाव परिसरात प्रेमविवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पती, सासू व नणंदेवर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मृत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: हा अपघात रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे झाला.
Ans: जाकादेवी येथील पांचाळ कुटुंबातील एका महिलेचा या अपघातात मृत्यू झाला.
Ans: भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली, त्यानंतर डंपर नियंत्रण सुटून खाली कोसळला.






