• दोन वर्षीय मुलीवर नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार
• खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला नेले
• आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा प्रकार उघड
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ग्रामीण भागातील दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (१७ जानेवारी) रोजी घडली. पोलिसांनी संशयित चुलत काकाला अटक केली आहे.
Govind Pansare: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू
काय घडलं नेमकं?
याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा नवरा, सासू व लहान मुलगी हे चौघे मंडणगड एसटी स्टँड येथे बसलेले होते. तेव्हा तिथे फिर्यादी यांचा चुलत दीर आला. त्याने मुलीस खाऊ देतो, असे सांगून तो मुलीला घेऊन गेला. पण तो परतला नाही. बराच वेळ झाला तो परत न आल्याने फिर्यादी, सासू व पती मुलीचा शोध घेण्यासाठी गेले. ते मंडणगड नगरपंचायतीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या देशी दारू दुकानाजवळ पोहोचले.
या दुकानाच्या बाजूला असलेल्या एका पडक्या खोलीतून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी धाव घेतली असता संशयित अत्याचार करत असल्याचे दिसले. मुलीच्या आई, वडिलांना पाहताच संशयिताने पळ काढला. या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी रविवारी संशयितास ताब्यात घेतले.पोलीस पुढील तपास करत असून, पुढील कारवाई केली जात आहे.
पोफळीतील पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार? ठेवी थकल्या; बोगस कर्ज कागदपत्रांचा आरोप
रत्नागिरीतील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. संस्थेतील ठेवी थकल्या असून, बोगस कर्ज प्रकरणं आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पोफळी येथील महानिर्मिती कंपनीतील कामगार, कर्मचारी व अभियंते यांनी स्थापन केलेल्या या पतसंस्थेकडे सुमारे 62 सभासदांचे दोन कोटी 25 लाख रुपयांचे ठेव खाते असल्याची माहिती असून, ही रक्कम परत न मिळाल्याने सभासदांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्जवसुलीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Ans: मंडणगड तालुक्यातील एका ग्रामीण भागात ही घटना घडली.
Ans: पीडित मुलीचा चुलत काका असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Ans: पडक्या खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीयांनी धाव घेतली.






