कसा झाला अपघात?
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोहित आप्पा भिल (वय 22, रा. शिंदे, ता. नंदूरबार) आणि साजन संजय भिल (वय 18,रा.. करजई, पोस्ट डामरखेडा, ता. शहादा) असे आहे. रोहित भिल याच लग्न अवघ्या १० दिवसांवर होता. तो आपल्या मित्रासोबत नातेवाईकांकडे लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघाला होता. नवापूर येथील जमील पठाण याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो (GJ-16-BB-1552)ही चारचाकी गाडी भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकल (GJ-05-BR-0452)ला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्याचे कळताच धानोरा परिसरातील नागरिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाला आग लावली. या घटनेने काही काळ घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नंदूरबार उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, नंदूरबार उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षकांकडून सुरू आहे.
घटनास्थळी रस्त्याचे काम सुरु
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असूनही ठेकेदारांकडून कोणतेही सूचनाफलक, दिशादर्शक चिन्हे किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला असून या निष्काळजीपणामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Bhandara Accident: हृदयद्रावक घटना! एसटी बसने दुचाकीला धडक, वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Ans: नंदूरबार जिल्ह्यातील धानोरा-नंदुरबार मार्गावर.
Ans: या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला.
Ans: संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत वाहनाला आग लावली.






