पंजाब: पंजाबच्या मोहाली येथे सोमवारी संध्याकाळी कबड्डीच्या सामन्यादरम्यान गोळीबार झालाच समोर आला आहे. यात प्रसिद्ध कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह ऊर्फ राणा बालाचौरियाची यांच्यावर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या आहेत. यात कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र भर मैदानात कबड्डीपटूवर गोळ्या झाडून हत्या केल्याने क्रीडाक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी सोशल मिडीयावर पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारीसुद्धा घेतली आहे. एवढेच नाही तर त्यामागील धक्कदायक कारण देखील सांगितले.
काय घडलं नेमकं?
सोमवारी संध्याकाळी मोहालीतील कबड्डी स्पर्धा सुरु होती. यावेळी शेकडो प्रेक्षकांच्या समोर एका कब्बडी खेळाडू व प्रमोटरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बालाचौरिया (वय 30) असे असून तो प्रसिद्ध कबड्डी प्रमोटर होता. त्याचा विवाह अवघ्या १० दिवसांपूर्वीच झाला होता. काँग्रेस नेते परगट सिंग यांच्यासह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले त्यात गोळीबाराचा क्षण कैद झाला आहे. ज्यात प्रेक्षक घाबरून सैरावैरा धावू लागल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि सिल्पफी काढण्याचा बहाण्याने नाल्याजवळ त्यांच्याजवळ गेले. जवळ पोहोचताच, त्यांनी पिस्तूल बाहेर काढून अगदी जवळून गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, मैदानावरील लोकांच्या पळून जाणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यासाठी हल्लेखोरांनी हवेत अनेक गोळ्या झाडल्या. तर डोक्यात आणि चेहऱ्यावर अनेक गोळ्या लागल्याने बालाचौरीया जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांना घटनास्थळी काय सापडले?
घटनास्थळी पोलिसांना ३२ कॅलिबरच्या चार ते पाच रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आणि प्राथमिक तपासात सहा ते सात गोळ्या झाडल्या गेल्याचे सामोर आले आहे. पथकांनी शोधमोहीम सुरु केली असून, स्थानिक सीसीटीव्ही फुटेज देखील दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये काय?
चौधरी-शगनप्रीत टोळीने सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी पुष्टी केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही हत्या “आमचा भाऊ सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूचा बदला” आहे. या पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, बालाचौरीयाचे संबंध प्रतिस्पर्धी जगू खोटी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी होते आणि त्याने मूसेवालाच्या मारेकऱ्याला आश्रय दिला होता. टोळीने “मक्खन अमृतसर आणि डिफॉल्टर करने” यांना या हत्येचे सूत्रधार म्हणून नाव दिले आहे.
Ans: पंजाबच्या मोहालीतील कबड्डी स्पर्धेदरम्यान.
Ans: कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बालाचौरिया.
Ans: सिद्धू मूसेवाला हत्येचा बदला असल्याचा दावा आरोपींनी केला आहे.






