२१ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, तिसर्या मजल्यावरून मारली उडी (फोटो सौजन्य-X)
Sathaye College student suicide in Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये कॉलेजमध्ये एका विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साठ्ये कॉलेज हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात आहे. गुरुवारी सकाळी या मुलीने साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
संध्या पाठक या मुलीचे नाव असून संध्या पाठक हिने टोकाचे पाऊल का उचलले , याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान संध्या पाठक हिने आत्महत्या केली नसल्याचा संशय तिच्या पालकांना आहे. संध्याला तिसऱ्या मजल्यावरून कुणीतरी धक्का दिला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा आरोप पालकांनी केला आहे.मात्र याबाबत महाविद्यालयाने ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे.
संध्या पाठकने आत्महत्या केली किंवा पडली, याबात अद्याप थोडाला संभ्रम आहे. महाविद्यालय प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयाना ती तिसऱ्या मजल्यावरून पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे सांगितले. याबद्दल अजूनही काही गोंधळ आहे. कॉलेज प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयांना सांगितले की ती तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली. तथापि, साठ्ये कॉलेजमध्ये या आत्महत्येची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. संध्या पाठक यांनी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला, सध्या विलेपार्ले पोलिसांकडून तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संध्या पाठक ही साठ्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. या घटनेनंतर पोलिसांनी कॉलेजचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडॉरमधून चालताना दिसत आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर संध्या पाठकला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत्यू घोषित केले.
संध्याच्या कुटुंबीयांनी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संध्याने आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, संध्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. तिला कोणीतरी ढकलेले असावे, असे संध्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.