File Photo : Satish-Wagh सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट
पुणे: विधानपरिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (55 वर्षे) यांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास शेवाळवाडी परिसरातून काही अज्ञातांनी सतीश वाघ यांचे अपहरण केले. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच त्यांचा सिंदवणे घाटात आढळून आला. यामुळे एकच खळबळ माजली होती.
या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.
सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या अवघ्या काही तासांच्या आतच करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. अपहऱण केल्यानंतर अवघ्या 10-15 मिनिटातच अपहरणकर्त्यांनी सतीन वाघ यांची कारमध्येच हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह सिंदवणे घाटात फेकून दिला आणि आरोपींनी तिथून पळ काढला.
परभणीत जमावबंदीचे आदेश लागू, शहरात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचे आदेश
सतीश वाघ यांची हत्या करणारे हे त्यांच्या घराशेजारीच राहत होते. आरोपींनी वैयक्तिक कारणातूनच सतीश वाघ यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, खंडणीसाठी त्यांची हत्या करण्यात आली नाही. त्यांच्या हत्येमागचे कारण वेगळेच असून पोलीस याचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सोमवारी पहाटे सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. फुरसुंगी फाटा परिसरात असताना नंबरप्लेट नसलेल्या कारमधून काहीजण तिथे आले आणि त्यांनी सतीश वाघ यांना गाडीमध्ये ओढून घेतले. सतीश वाघ यांच्या अपहरणाची माहिती कळतात त्याचा मुलगा ओकांर वाघ याने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करताच आरोपींचा शोध सुरू केला.
ना फोन, ना रिल्स ना कॉल! फक्त 8 तास अंथरुणावर झोपून अन् महिला जिकंली 1 लाख
पण अपहरण केल्यानंतर 10-15 मिनिटातच आरोपींनी त्यांची हत्या केली होती.सतीश वाघ यांच्यावर चाकून आणि लाकडे दांड्याने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांना सिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकून आरोपींनी पळ काढला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना त्यांचा मिळला. याबाबत स्थानिकांनी उरुळीकांचन पोलिसांना माहिती दिली.
वाघ यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवळपास 400 ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. अपहरण करण्यासाठी अज्ञातांनी जी कार वापरली होती त्याच्याशी साधर्म्य असलेल्या 500 कार तपासण्यात आल्या. तपासाला गती देण्यात आली. सर्व स्तरावरील तपास सुरू होता. त्यानंतर सांयकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे, असंही अमितेश कुमार यांनी सांगितले.