Pune Water Crisis : उन्हाच्या तडाख्यात पुण्यात पाणी टंचाई; अनेक गावे, वस्त्या टँकरच्या भरोशावर, 'या' गावाला सर्वाधिक झळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन
आंबेगाव तालुक्यातील २८ गावे आणि ९५ वाड्या-वस्त्या सध्या पाणीटंचाईच्या विळख्यात सापडल्या आहेत. येथील सुमारे ३१ हजार लोकांची तहान भागवण्यासाठी तब्बल २५ टँकर्स सुरू करावे लागले आहेत. या उलट, नेहमी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात आतापर्यंत केवळ ७ टँकर्स सुरू आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. येत्या दोन दिवसांत अनेक धरणांमधून कालव्यांमध्ये शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र, धरणांच्या लाभक्षेत्राबाहेर (Non-command area) असलेल्या गावांना या पाणीटंचाईने ग्रासले आहे. केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्याचा दावा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील पाणीटंचाईची वस्तुस्थिती मात्र अजूनही कायम आहे.
दोन सख्ख्या बहिणी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, अचानक बिबट्याने झडप घातली अन्…; ओतूरमधील धक्कादायक घटना






