H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा थेट अल्टीमेटम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या हजारो इंजिनिर्यसचे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचे आयुष्य धोक्यात आले आहे. मेटा, ॲमेझॉन, आणि लिंक्डइन यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी AI आणि ऑटोमेशनमधील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकन ड्रोम असणाऱ्या हजारो भारतीयांचे स्वप्न धोक्यात आले आहे.
H-1B व्हिसा थेट कंपनीशी जोडलेला असल्याने नोकरी जाणे केवळ आर्थिक फटका नसून देशातून बाहेर पडण्याचाही काऊंटडाऊन आहे. सध्या ६० दिवसांचा ग्रेस पिरीयड शेवटचा पगार मिळाल्यापासून नाही, तर कामाच्या शेवटच्या दिवसापासून मोजला जात आहे.






