नशेखोराची तरुणांना बेदम मारहाण
दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या आईसोबत असेलेल्या अनैतिक संबंध असल्याचं कोणालाही माहिती पडू नये यासाठी एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या आठ वर्षाच्या चिमुकलीच्या गळा दाबून निर्घृण हत्या केली. आरोपी ओगसिद्ध कोठे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ichalkaranji Crime: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्…; इचलकरंजीतील धक्कादायक घटना
नेमकं काय प्रकरण?
ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात घडली. शुक्रवारी (दि. 23 मे) ला संध्याकाळच्या सुमारास एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरवातीला पोलिसांनी ही गोष्ट आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला. त्यावेळी गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समजलं. त्यानंतर मंद्रूप पोलीस ठाण्यात सहा पोलीस निरिक्षक मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोपी ओगसिद्ध कोठे याचे स्वतःच्याच आईसोबत अनैतिक संबंध होते. मृत चिमुकली श्रावणी हिने स्वतःच्या वडिलांना आणि आजीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. या प्रकाराबाबत श्रावणीने कोणाला काही सांगू नये म्हणून नराधम बापाने तिला आधी बेदम मारहाण केली होती. यानंतर पत्नी वनिता घरी नसताना नराधम बापाने चिमुकलीचा गळा दाबून खून केला. नराधम आरोपी इतक्यावरच थांबला नाही, मृतदेह घरासमोरच खड्डा खोदून पुरण्यात आला.
गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह बाहेर काढून तपास सुरु केला. या प्रकरणी आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
प्रियकराच्या दबावामुळे मुंबईतील तरूणीने केली आत्महत्या, तीन महिन्यांनी धक्कादायक कारण समोर