मुंबईतील मशीद बंदर परिसरात राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं होत. तरुणीने ८ मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी शनिवारी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा तरुणीचा प्रियकर असल्याचं समोर आला आहे. तरुणीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मुलीच्या मोबाईलवरील मेसेज पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
Ichalkaranji Crime: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्…; इचलकरंजीतील धक्कादायक घटना
मृत तरुणी ही चरणी चर्नीरोड येथील महाविद्यालयात बँकेशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. मृत तरुणी मशीद बंदर येथे पालकांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचा बांधकाम क्षेत्राशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहम बेंगडे असे आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी २० वर्षीय आरोपी प्रियकराला पायधुनी पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती उपयुक्त मोहित गर्ग यांनी दिली.
८ मे रोजी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी आली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मुलीला दूरध्वनी केला. पण मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांना घरी जाऊन मुलीला आपल्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पाहिले असता तिने घरात गळफास घेतला होता. तातडीने मुलीला जवळच्याच नूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. काही दिवसांनी मुलीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिले असता आरोपी सोहम बेंगडे आणि एका मैत्रिणीसह त्यांच्या घरात डोकावत असल्याचे दिसून आले.
मुलीच्या मोबाईलमध्ये कॉल लॉग तपासले. त्यावेळी सोहम बेंगडेने आत्महत्येच्या दिवशी अनेकवेळा तरुणीला कॉल केले होते. तसेच त्यांच्या मैत्रिणीने अनेक मिस्ड कॉल्स केल्याचे आढळले. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या परिचीत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचे मेसेज तपासले असता आरोपी व मृत तरुणीचे संभाळण दिसून आले होते. तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यांच्या संदेशातून ते स्पष्ट झाले. त्यांनतर पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून बेंगडे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Pune News : कोंढव्यात भरदिवसा घरफोडी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास