ताम्हिणी घाटात भीषण अपघात (फोटो- istockphoto)
पुण्याजवळील ताम्हिणी घाटात भीषण अपघात
थार गाडी 500 फुट दरीत कोसळल्याची शक्यता
या घटनेत 6 जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातून कोकणात जाणाऱ्या ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. एक थार गाडी थेट 500 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ताम्हिणी घाट हा पुण्यातून कोकणात उतरण्यासाठी वापरला जातो. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 6 जणांचा शोध घेतला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून कोकणात जाणाऱ्या एका थार गाडीचा भीषण अपघात झाला आहे. तीव्र वळणावर गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट 500 फूट दरीत कोसळली असल्याचे समजते आहे. या भीषण घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार थार गाडीतील लोक पर्यटनासाठी कोकणात जात होते. मात्र तीन दिवस त्यांचा संपर्क न झाल्याने नातेवाइकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर या कारकहा शोध घेतला जात आहे. घाटात शोधकार्य करताना अडचणी येत असून, गाडीतील 6 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Tamhini घाटात भयानक अपघात
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. चालत्या कारवर दगड पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटातून एका कार जात असताना डोंगरावरून एक दगड खाली घसरत आला. हा दगड थेट कारवर जाऊन कोसळला. या दगडाचा वेग इतका होता की हा दगड कारचे सनरूफ तोडून गाडीत असलेल्या महिलेच्या डोक्यात पडला या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे.
ताम्हिणी घाटातून प्रवास करणारी गाडी पुणे मार्गे कोकणात जात सल्याचे समजते आहे. दरम्यान महिलेच्या डोक्यात दगड लागताच त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेले गेले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल जात आहे.
वरून दगड आला, सनरूफ फोडून महिलेच्या डोक्यात लागला; Tamhini घाटात भयानक अपघात
साई भक्तांवर काळाचा घाला
नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात गाडीने चक्क तीन पलट्या घेतल्या असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव – रायते शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे.






