बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला 'ईडी'चा दणका! (Photo Credit - X)
या प्रकरणात ईडीची कारवाई
ईडी सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे आणि या बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कचे पैसे कसे आणि कोणाकडे पोहोचले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये सोनू सूद यांच्या मालकीचे अंदाजे १ कोटी, मिमी चक्रवर्ती यांच्या मालकीचे ५९ लाख, युवराज सिंग यांच्या मालकीचे ₹२५ लाख, नेहा शर्मा यांच्या मालकीचे १२.६ लाख, रॉबिन उथप्पा यांच्या मालकीचे ८२.६ लाख, अंकुश हाजरा यांच्या मालकीचे ४७ लाख आणि उर्वशी रौतेला यांच्या आईच्या मालकीचे अंदाजे २०.२ ळाख यांचा समावेश आहे.
#BREAKING The Enforcement Directorate (ED) has provisionally attached assets worth Rs. 7.93 crore of Yuvraj Singh, Robin Uthappa, Urvashi Rautela, Sonu Sood, Mimi Chakraborty, Ankush Hazra, and Neha Sharma under the PMLA. The move follows investigations revealing their… pic.twitter.com/fe5cPpBbpj — IANS (@ians_india) December 19, 2025
कोणाची किती मालमत्ता जप्त?
सोनू सूद (अभिनेता): अंदाजे १ कोटी रुपये.
युवराज सिंग (माजी क्रिकेटपटू): २५ लाख रुपये.
रॉबिन उथप्पा (माजी क्रिकेटपटू): ८२.६ लाख रुपये.
मिमी चक्रवर्ती (माजी खासदार व अभिनेत्री): ५९ लाख रुपये.
उर्वशी रौतेलाची आई: अंदाजे २०.२ लाख रुपये.
नेहा शर्मा (अभिनेत्री): १२.६ लाख रुपये.
अंकुश हाजरा (बंगाली अभिनेता): ४७ लाख रुपये
१,००० कोटींचा घोटाळा आणि ‘गुन्ह्याची कमाई’
या प्रकरणाची एकूण किंमत ₹१,००० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) तात्पुरता आदेश जारी केला आहे. त्यानंतर अभिनेत्री नेहा शर्मा, मॉडेल उर्वशी रौतेलाची आई आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
आधीच झाली होती चौकशी
या सर्व सेलिब्रिटींची ईडीने यापूर्वी चौकशी केली आहे. एजन्सीने या मालमत्ता कुराकाओमध्ये नोंदणीकृत असलेल्या कथित बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xbet शी संबंधित “गुन्ह्यातून मिळालेली कमाई” मानली आहे, जी पीएमएलए अंतर्गत बेकायदेशीर पैसे म्हणून वर्गीकृत आहे. ईडीने यापूर्वी या प्रकरणात कारवाई केली आहे. तपासादरम्यान, माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या सुमारे ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आधीच जप्ती आणली आहे.






