संग्रहित फोटो
पुणे : रेंजहिल्स येथील अशोकनगर परिसरात दुर्वांकुर बिल्डींग येथे चोरट्यांनी व्यावसायीकाच्या घरी घरफोडी करून १ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरी करून नेला आहे. यात सोन्याचे दागिने, मौल्यवान दगड, चांदीच्या नाण्याच्या आकाराच्या मुर्ती तसेच, अमेरीकन डॉलर, चायनिज येन व हाँगकाँग डॉलर तसेच २५ हजारांची रोकड चोरी करून नेली. याबाबत स्वप्नील विजय अडकर (वय ३४, रा. पांडुरंग कॉलनी, पुजा अपार्टमेंट, एरंडवणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार ८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
तक्रारदार हे व्यावसायीक आहेत. मागील २२ वर्षापूर्वी रेंजहिल्स येथून अडकर आणि त्यांचे कुटुंबिय एरंडवणे येथे राहण्यास आले. त्यावेळी काही सामान रेंजहिल्स येथील घरीच होते. दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारस काही साहित्य घेऊन जाण्यासाठी तक्रारदार व त्यांची पत्नी त्यांच्या अशोकनगर येथील जुन्या घरी गेले. नंतर व्यवस्थील लॉक करून घरी आले. मात्र दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्या अशोकनगर येथील फ्लॅटच्या वर राहणार्या शेजार्यांनी त्यांना त्यांच्या घराचे कुलुप तोडलेले दिसत असल्याचे सांगितले. घरी गेल्यावर पाहिल्यावर घरातील मौल्यवान वस्तु, विदेशी चलनी नोटा सह रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.
तरुणाला धमकावून दुचाकी चोरी
हडपसर भागात तरुणाला धमकावून त्याची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरूण हडपसर भागात राहायला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो हडपसर भागातील क्रेझी कॅफेसमोर थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी त्याला धमकाविले. त्याला मारहाण केली. त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. अधिक तपास उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत.