प्रेमभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 'जिसे मैं पसंत करता था, उसने...'' (File Photo : Suicide)
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वढू बुद्रुक, कोंढापुरी व शिक्रापूर येथे एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या करून जीवन संपवले. या आत्महत्येच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
वढू बुद्रुक येथे मंगेश रंगनाथ भंडारे (वय 37, रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे), तर कोंढापुरी येथे गोविंद बोकरराव दुधारे (वय ६०, रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गोळेगाव ता. पूर्णा जि. परभणी) आणि शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे विष्णू शेषराव चव्हाण (वय ४०, रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेचखेडा जि. यवतमाळ) या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेदेखील वाचा : Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती
दरम्यान, या तिघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. तिघा इसमांच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.
पुण्यातील धनकवडीत तरुणाची आत्महत्या
धनकवडी परिसरात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, त्याने तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२) यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, एका महिलेसह अल्पवयीन मुलगा व एका मुलीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…; पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?