महिलेचे मंगळसूत्र हिसकावले (फोटो- सोशल मिडिया)
शिक्रापूर: कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पुलावरून अदिती भिगावडे ही महिला तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाहून तिच्या ताब्यातील दुचाकीहून आईसह पुणे बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत होती. त्यावळेस पाठीमागून एका दुचाकीवरून दोन युवक आले आणि त्यांनी आदिती यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर दोन्ही युवक शिक्रापूरच्या दिशेने पळून गेले.
याबाबत अदिती विशाल भोगावडे वय २० वर्षे रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात दोघा युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पुढील पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उद्धव भालेराव हे करत आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत विजय दुर्गावळे यांनी शहर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कराडमध्ये चोरट्यांचा प्रताप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विजय दुर्गावळे यांच्या पत्नी छाया दुर्गावळे या शुक्रवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कोयना वसाहत-जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. ७ वाजून २५ मिनिटांनी त्या जखिणवाडी रोडने चालत घराकडे येत होत्या. त्यावेळी दुर्गावळे यांच्या घराच्या गेटसमोर रस्त्यावर तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन व्यक्ती दुचाकीवर थांबल्या होत्या. समोरून छाया दुर्गावळे येत असताना चोरटयांनी त्यांच्या दिशेने दुचाकीवरून जात त्यांच्यासमोर दुचाकी थांबवली.
Crime News : निमगाव दुडेत तक्रार मागे घेण्यासाठी इसमाला मारहाण; शिक्रापूरमध्ये धक्कादायक प्रकार
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.