साताऱ्यातील कराडमधून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वात:ला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बाबा सिद्धीकी हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला कॅनडात अटक; भारतात आणायची प्रक्रिया सुरू
काय आहे प्रकार?
सातारच्या कराडमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. कराडमधील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे. हे व्हीडीओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले. हे प्रकार सोशल मीडियावर वायरल होऊ नयेत म्हणून पीडित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी कराड पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे कराड मधील एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु असून, या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता अशी माहितीही समोर आली आहे. चौकशी दरम्यान अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत, असेही पोलिसांनी याबाबत अधिकृतरीत्या सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पोलीस ठाण्याला पंधरा दिवसांपूर्वी दोन डॉक्टर महिलांची तक्रार आली होती. त्यांचे अश्लील व्हिडीओ एका इसमाने टाकल्याची तक्रार आली होती. या तक्रारीवरून कराड पोलीस ठाण्यात आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबरच्या मदतीने हे व्हिडीओ कोणी टाकले आहे. त्याचा तपास करत असतांना विकास शर्मा या पंजाबच्या इसमाने हे केल्याचे उघड झाले आहे. ५४ वर्षाच्या या इसमाने सांगितले की कराड मधील राजीव शिंदे या डॉक्टर इसमाने हा प्रकार करायला सांगितल्याचे त्याने सांगितले.
पैशांची गरज, टास्क करायला सांगितला
पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं एक टास्क करावा लागेल. यामध्ये मी सांगतो तसं कर असं सांगत, यावेळी राजेश शिंदे या आरोपीने काही मोबाईल नंबर पाठवत या नंबरचा ग्रुप करण्यास सांगितले. यानंतर महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करत तो पाठवला. विकास शर्मा या इसमाने त्याच्या मोबाईलवरून हे अश्लील व्हिडिओ पुढे टाकले. असे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात विकास शर्मा आणि राजेश शिंदे या दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बीडमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय; लाखोंचा गंडा…..