प्राइवेट पार्टवर अन् शरीरावर स्क्रूड्रायव्हरने 40 वेळा वार..., दुसऱ्या मुलाशी बोलतेय म्हणून प्रियकरानं केली प्रेयसीची क्रूर हत्या (फोटो सौजन्य-X)
Uttar Pradesh Crime in Marathi : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील मैनाथर भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे २० वर्षीय सायराची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. गावाजवळील मक्याच्या शेतात तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की मृतदेह पाहून सर्वांचा थरकाप उडाला. पीडितेच्या शरीरावर स्क्रूड्रायव्हरने गुप्तांगांसह ३० हून अधिक वार झाले होते. आरोपी प्रियकर रफीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. नेमकं कारण काय?
शनिवार संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या सायराच्या कुटुंबाने रात्रभर तिचा शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सायराची आई शफीना तिचा शोध घेत नरोडा रोडवरील मंदिराजवळील शेतात पोहोचली. तिथे तिला जब्बार नावाच्या व्यक्तीच्या मक्याच्या शेतात तिच्या मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. हे दृश्य इतके भयानक होते की आईच्या ओरडण्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आणि शोककळा पसरली. सायराच्या शरीरावर स्क्रूड्रायव्हरचे ३० हून अधिक वार होते, ज्यावरून ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट होते. तिची अवस्था पाहून गावकरी स्तब्ध झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान २० वर्षीय आरोपी मोहम्मद रफी याने दावा केला की तो तिचा प्रियकर होता. पण ती गेल्या तीन महिन्यांपासून दुसऱ्या एका पुरुषाशी बोलत होती. यामुळे तो अस्वस्थ होता. त्याने पुढे पोलिसांना सांगितले की, पहिल्यांदा त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला; यादरम्यान ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती बेशुद्ध पडली, तेव्हा त्याने तिच्यावर निर्दयीपणे स्क्रूड्रायव्हरने वार करुन तिला भोसकले. जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तिच्यावर वार करत राहिला.” इतक्या क्रूरपणे तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मुरादाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एसपी ग्रामीण कुंवर आकाश सिंह म्हणाले की, आरोपी आणि मृताचे प्रेमसंबंध होते आणि दोघांमध्ये भांडण झाले होते. अशा परिस्थितीत शनिवारी आरोपी स्क्रूड्रायव्हर आणि इतर शस्त्रे पूर्णपणे तयार करून घेऊन गेला. त्याने मुलीला जंगलात बोलावून तिच्यावर हल्ला केला. स्क्रूड्रायव्हरने केलेल्या हल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.