उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशमधून बलात्काराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीने बलात्कार करून तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढलं होत. पीडित मुलीची प्रकृती अतिशय नाजूक आहे. हैराण करणारी बाब म्हणजे पाच वर्षांच्या मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी १२ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (29 ऑक्टोबर) संध्याकाळी पीडित मुलगी तिच्या घराबाहेरच्या परिसरात खेळत होती. त्यावेळेस आरोपी मुलगा मुलीला घेऊन परिसरातील एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीला गंभीर अवस्थेत तेथेच सोडून त्याने पळ काढला.
चिमुकलीची प्रकृती गंभीर
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी मेरठमधील एका विशेष वैद्यकीय केंद्रामध्ये नेण्याचा सल्ला दिला, जेथे पीडितेवर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती अद्याप नाजूक आहे.
१२ वर्षीय मुलगा ताब्यात
पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटवून तपास सुरू केला आणि शुक्रवारी (31 ऑक्टोबर) त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू आहे. घडलेला प्रकार अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे. ही धक्कदायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरामध्ये घडली आहे.
भररस्त्यात महिलेचा विनयभंग; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉन्स्टेबल निलंबित
उत्तरप्रदेश येथून एका पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. भररस्त्यात महिलेचा कथित स्वरूपात विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी एका कॉन्स्टेबलविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारेच कॉन्स्टेबल विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला आणि निलंबित कॉन्स्टेबलमधील वाद कैद झाला होता. तसेच या महिला पोलिसांच्या गाडीकडे कॉन्स्टेबलला ओढून नेतानाही दिसत आहेत.
पीडितेने केलेले आरोप काय?
पीडित महिलेने तक्रार नोंदवतांना आरोप केला आहे की, नजीराबाद नजीराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस रिस्पॉन्स व्हेहिकल सेवेमध्ये (पीआरव्ही) तैनात असणाऱ्या कॉन्स्टेबल बृजेश सिंहने भररस्त्यात तिची छेड काढली. “मी एकटी होते, म्हणून सुरुवातीस शांत राहिले, पण त्याचे गैरवर्तन सुरूच होते”; अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली.






