• 15 दिवसांत सहा मृतदेह सापडल्याने भीती
• विरार फाट्यावर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला
• काही गुन्ह्यांचा उलगडा, काही प्रकरणांचा तपास सुरू
वसई: वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मृतदेह सापडण्याची मालिका सुरु आहेच. आता पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत ही सहावी घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
काय घडलं नेमकं?
रविवारी सायंकाळी काही स्थानिक लोकांना महामार्गावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ दुर्गंधी आली. त्यांनी तपास केला असता तिथे एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे आहे. त्याला पांढरी दाढी आहे. मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे, अपघाती आहे की घातपात, याचा शोध पोलीस घेत आहेत.
15 दिवसांत सापडले ६ मृतदेह
21 मार्च (शिरवली): महिलेचा कुजलेला मृतदेह; पतीनेच खून केल्याचे निष्पन्न, आरोपी पती अटकेत.
23-24 मार्च (धानिवबाग): 6 वर्षीय बेपत्ता बालिकेचा विहिरीत मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
26-27 मार्च (पेल्हार फाटा): शिर छाटलेल्या अवस्थेत पुरुषाची हत्या; आर्थिक वादातून खून झाल्याचे स्पष्ट, आरोपी जेरबंद.
मार्च अखेर (नालासोपारा पश्चिम): डी-मार्ट परिसरातील नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह.
30-31 मार्च (फुलपाडा): एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला.
5 एप्रिल (विरार फाटा): सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह.
नागरिक चिंतेत
एकामागून एक मृतदेह सापडत असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आणि निर्जन स्थळांमध्ये अशा घटनांना वाव मिळत असल्याची तक्रार नागिरक करत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar: पोहण्याचा आनंद ठरला जीवघेणा; हर्सूल तलावात 4 तरुणांचा बुडून मृत्यू
Ans: किती दिवसांत किती मृतदेह सापडले?
Ans: विरार फाटा, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर.
Ans: अज्ञात मृतदेहांची ओळख पटवणे आणि मृत्यूचे कारण शोधणे.






