धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर...
बनासकांठा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता बनासकांठा जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधांतून एका 9 मुलांच्या आईने आपल्या प्रेमी आणि त्याच्या साथीदारासह मिळून स्वतःच्याच पतीची कथितपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मृत व्यक्तीच्या पत्नीसह 3 आरोपींना अटक केली. मृतक आणि आरोपी महिलेला एकूण 9 मुले आहेत, ज्यामध्ये आठ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. यातील 4 मुलींचे लग्न झाले आहे, तर चार लहान मुली आणि एक लहान मुलगा आता आई-वडील दोघांच्याही छत्रछायेला मुकले आहेत; कारण वडिलांची हत्या झाली आहे आणि आई हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेली आहे. या घटनेने संपूर्ण गाव स्तब्ध झाले आहे.
गणेशपुरा गावात राहणारे गमाभाई ठाकोर हे गेल्या चार वर्षांपासून वाव-थराद परिसरात आपल्या कुटुंबासह शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. ८ जुलै रोजी त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा सामान्य मृत्यू वाटत होता, परंतु शवविच्छेदन अहवालात हत्येची पुष्टी झाली.
आधी वाद झाला अन् नंतर हत्याच…
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मृतक गमाभाई यांची पत्नी नर्मदा ऊर्फ नबाबेन हिचे गावातीलच प्रेमजी पटेल नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. घटनेच्या दिवशी गमाभाई शेत नांगरून उशिरा संध्याकाळी घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पत्नीला प्रेमजी पटेल आणि मुकेश ठाकोर यांच्यासोबत पाहिले. याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार भांडण आणि वाद सुरू झाला होता, ज्याचा शेवट या हत्येने झाला.
नवी मुंबईतही हत्या
दुसरीकडे, नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. बहुचर्चित सिया-केतन हत्याकांड चर्चेत असतानाच एका विवाहित महिलेने ऑटोचालक प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर, या जोडप्याने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकले आणि जवळपास ११ महिने पोलिसांना चकमा दिला. अखेरीस, पोलिसांनी या खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावला आणि आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली.






