डोंबिवली: प्रसुतिनंतर महिलेचा मृत्यू झाला असल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला आहे. डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडला असून नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे. डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात राहणाऱ्या अविनाश सरोदे यांनी पत्नी सुवर्णा सरोदे हिला बुधवारी प्रसुतीसाठी डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले .सुवर्णा हिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. याबाबत सुवर्णा हिचे पती अविनाश सरोदे यांच्या आरोप आहे की, ज्या डॉक्टरने सhवर्णाचे ऑपरेशन केले, ऑपरेशन करण्याआधी आमच्याकडून कोणत्याही प्रकाराची परवानगी घेतली नाही. परवानगीशिवाय डॉक्टरांनी ऑपरेशन केले कसे ? डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून जाणार नाही आणि तसेच पुढील प्रक्रिया करणार नाही.
लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; तब्बल 5 लाखांना घातला गंडा
प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या 32 तासापासून महिलेचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत डॉक्टरच्या विरोधात कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नातेवाईक कारवाईवर ठाम आहेत.
याबाबत हॉस्पिटलचे मुख्य आरोग्य अधिकारी योगेश चौधरी यांचा म्हणणे आहे की, जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट येत नाही. डॉक्टरांची टीम याबाबत काय निर्णय घेत नाही. तोपर्यंत याबाबत काही ही बोलू शकणार नाही. सुवर्णा हिच्या मृत्यूला जवळपास 32 तास उलटले आहेत.तिचा मृतदेहावर अजून पोस्टमार्टम देखील झालेले नाही. नातेवाईक हॉस्पिटल परिसरात ठिय्या मांडून बसले आहेत. हॉस्पिटल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.