(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने अलिकडेच जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थने आजवर मराठीसह बॉलिवूडमध्ये ही आपला ठसा उमटवला आहे. बॉलवूड सुपरस्टार रणवीर सिंह आणि सिद्धार्थ यांच्यात खूप छान मैत्रीचे नात आहे. या दोघांनी सर्कस, सिंबा या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. रणवीर सिंहने सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीला लग्नाच्या रिसेप्शनसाठी आमंत्रित केलं होते. यावेळीचा एक खास किस्सा सिद्धार्थ ने सांगितला आहे.
नुकतीच सिद्धार्ख जाधवने बॉलिवूड बबल ला मुलाखती दिली. यावेळी त्याने रणवीरच्या रिसेप्शनचा किस्सा शेअर केला. सिद्धार्थ म्हणाला, ” रणवीर सरांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आम्ही गेलो होते. आणि तेव्हा मी starstruck झालो होतो.
यामागचे कारण देखील सिद्धार्थने सांगितले,”रिसेप्श पार्टीला सचिन तेंडुलकर सर, अमिताभ बच्चन सर, विकी कौशल सर असे अनेक स्टार्स होते. मी माझ्या पत्नी बरोबर त्या पार्टीला गेलो होतो.मी तृप्तीला १० व्या मिनिटाला म्हणालो, चल निघू आपण इथून, मग तिने मला थांबवलं. माझं असं झालेलं की.. या सगळ्या कलाकरांना मी एकत्र पाहतोय… बाबा माझे! मी एकदमच भारावून गेलो. कारण, अशा मोठ्या पार्टीला मी पहिल्यांदाच गेलो होतो.”
रिसेप्शनमधील अनुभव सांगताना Siddharth Jadhav म्हणाला, “त्यानंतर आम्ही दोघंही Ranveer Singh सर आणि Deepika Padukone मॅमना जाऊन भेटलो. त्या दोघांचं अभिनंदन केलं आणि मी लगेच पार्टीतून निघालो. या सगळ्या मोठ्या कलाकारांना पहिल्यांदाच पाहून मी खरंच भारावून गेलो होतो. आजवर या सगळ्या कलाकारांना मी फक्त पडद्यावर पाहिलं होतं. त्यामुळे यांना असं प्रत्यक्ष पाहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं.” बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना एकाच ठिकाणी पाहण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव असल्याने तो काहीसा अवाक् झाल्याचंही त्याने सांगितले.
दरम्यान, रणवीरसोबतच्या मैत्रीबाबत बोलताना सिद्धार्थने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांची ओळख आणि मैत्री दिग्दर्शक Rohit Shetty यांच्यामुळे झाली. ‘सिंबा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विमानप्रवासात त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर चित्रिकरणादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली.
“आम्ही दोघं कितीही मस्ती करत असलो तरी रोहित शेट्टीला मात्र घाबरतो. हीच गोष्ट आमच्या मैत्रीचं आणखी एक कारण ठरली,” असं सिद्धार्थने हसत-हसत सांगितलं होतं. रणवीर आणि सिद्धार्थ यांची ही मैत्री आजही कायम असून, दोघे अनेकदा एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकी व्यक्त करताना दिसतात.






