(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Orry Hermes bag: सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला ओरी उर्फ ओरहान अवतरामानी हा नेहमीच आपल्या आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत असतो. मोठ्या बॉलिवूड पार्ट्या, सेलिब्रिटींसोबतचे फोटो आणि महागड्या फॅशन स्टाईलमुळे ओरीची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. आता तो रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 15’ या स्टंट रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे.
शोमध्ये ओरी स्टंट करताना दिसत असला तरी सध्या त्याच्या स्टंटपेक्षा त्याच्या महागड्या बॅगचीच जास्त चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये ओरीची हर्मेस ब्रँडची बॅग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसली. या बॅगची किंमत तब्बल ७५ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
एपिसोडमध्ये रोहित शेट्टीने ओरीकडे असलेल्या बॅगबद्दल विचारले. त्याने सांगितले की, “मी ऐकले आहे की तुझ्या बॅगची किंमत ७१ लाख रुपये आहे.” यावर ओरीने सांगितले की, “नाही, ती ७१ नाही तर ७५ लाख रुपयांची आहे.”
बॅगची किंमत सांगताना ओरीने चेहरा झाकला, तर एवढी मोठी किंमत ऐकून रोहित शेट्टीही आश्चर्यचकित झाला. त्याने मजेशीर अंदाजात ओरीला विचारले की, “ही बॅग कुठून चोरली आहेस का?” यावेळी अविनाशने गंमतीने म्हटले की, “शो जिंकूनही एवढे पैसे मिळणार नाहीत.”
याआधीही ओरी त्याच्या महागड्या बॅगमुळे चर्चेत आला होता. शोमध्ये तो गुलाबी रंगाच्या हर्मेस साईड बॅगसह दिसला होता. रोहित शेट्टीने त्या बॅगची किंमत विचारल्यानंतर ओरीने आधी २२ हजार रुपये सांगितले, मात्र नंतर ती बॅग २२ लाख रुपयांची असल्याचे सांगितले.
View this post on Instagram
ओरी हा सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असून मोठ्या ब्रँड्ससोबत काम करतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रिपोर्ट्सनुसार, तो एका कार्यक्रमासाठी मोठी फी घेत असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी 15’मध्ये ओरीच्या सहभागामुळे आणि त्याच्या लक्झरी स्टाईलमुळे शोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.






