(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) जागतिक स्तरावर यशस्वी ठरली असली तरी तिचे भारतीय संस्कृतीवरील प्रेम आजही कायम आहे. त्यामुळेच ती आपली मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास हिला लहानपणापासून भारतीय परंपरा आणि आध्यात्मिक संस्कारांची ओळख करून देताना दिसते.
नुकताच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मालतीला मांडीवर बसवून ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवत असल्याचे दिसते. प्रियांका स्वतः मंत्र म्हणते आणि मालतीलाही प्रेमाने ते म्हणण्यास प्रोत्साहन देते. हा गोड क्षण पाहून चाहत्यांनी तिच्या संस्कारांचे भरभरून कौतुक केले आहे.
याच पोस्टमध्ये प्रियांकाने स्वतःची दोन रूपेही दाखवली आहेत. एका बाजूला ती ‘मामा’ म्हणून मुलीला संस्कार देताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला ‘मामासिता’ अवतारात ग्लॅमरस लूकमध्ये डान्स फ्लोअरवर ठेका धरताना दिसते. तिच्या या कॅप्शनने आणि व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी २०१८ मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न केले. १५ जानेवारी २०२२ रोजी सरोगसीद्वारे त्यांच्या मुलगी मालतीचा जन्म झाला. तेव्हापासून हे दोघेही सोशल मीडियावर मालतीसोबतचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
View this post on Instagram
अलीकडेच प्रियांकाने मालती आणि तिची आजी डॉ. मधू चोप्रा यांचा एक भावनिक फोटोही शेअर केला होता. तसेच, एका व्हिडिओमध्ये मालती टीव्हीवर आईचे ‘तुने मारी एन्ट्रीयाँ’ हे गाणे उत्साहाने पाहताना दिसली होती. तो व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने, “कोणी विचार केला असेल?” असे कॅप्शन दिले होते.
दरम्यान, प्रियांकाच्या या नव्या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, जागतिक स्टार बनल्यानंतरही ती आपल्या मुलीला भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यास प्राधान्य देते.






