(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ज्या करदात्यांनी अद्याप आपला रिटर्न दाखल केलेला नाही, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल: अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आता ते आपला आयटीआर दाखल करू शकतात का? जर तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर काही पर्याय आहेत ज्याचा वापर करु शकता. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या दंडाला सामोरं जावं लागणार नाहीत. नेमके काय आहेत हे पर्याय ?
ज्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आपला आयटीआर दाखल केलेला नाही, ते अंतिम मुदतीनंतरही आपला रिटर्न दाखल करू शकतात. परंतु रिटर्न दाखल करण्यापूर्वी त्यांनी काही अटी माहित असणं गरजेचं आहे. त्याची जाणीव ठेवून पुढे ही प्रक्रिया करावी. आयकर कायद्याच्या कलम १३९(४) अंतर्गत विलंबित रिटर्न दाखल केले जाऊ शकतात. मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी विलंबित रिटर्न ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत दाखल केले जाऊ शकतात. पण, जर तुमचे मूल्यांकन त्यापूर्वी पूर्ण झाले असेल, तर त्यानंतर रिटर्न दाखल करता येणार नाही.
विलंबित रिटर्न भरण्यापूर्वी, फॉर्म 16, फॉर्म 26AS, TIS, AIS आणि बँक व्याज यांसारखी काही महत्त्वाची माहिती भरणे आवश्यक आहे. जर तुमची कोणतीही थकबाकी असेल, तर ती आधी भरा, त्यानंतर तुमचा विलंबित रिटर्न भरा आणि ई-व्हेरिफाय करा.
आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत, विलंबित आयटीआर भरल्यास विलंब शुल्क आकारले जाते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर ₹5,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपर्यंत असेल, तर ₹1,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते.
याव्यतिरिक्त, जर करदात्याची थकबाकी असेल, तर त्यांना कलम 234A, 234B आणि 234C अंतर्गत केवळ विलंब शुल्कच नव्हे, तर व्याज देखील भरावे लागेल.
या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून पुढची सगळी प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला लेट फी लागु शकते हे जाणून घेणे गरजेचे आहे.






