फोटो सौजन्य - Social Media
दिवाळी हा उजाळ्याचा उत्सव आहे. देशभरात दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. लहान मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती प्रत्येकाला फटाके उडवण्याची हौस असते. दिवाळीमध्ये या हौसेला चालना देण्याची संधी मिळते. या उत्सवात लोक फटाके फोडून आपला आनंद आणि जल्लोष साजरा करतात.
वनवासानंतर प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत आगमन म्हणून देशात दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली. या दिवसात घरोघरी पणत्या लागू लागल्या. आगमनामुळे उत्सव म्हणून लोक फटाके फोडू लागले आपला आनंद व्यक्त करू लागले.
हे देखील वाचा : महिलांसाठी खजूर आहे फायदेशीर, रोज रिकाम्या पोटी खावे 2 खजूर
परंतु आत्ताच्या घडीला वाढत्या प्रदूषणामध्ये फटाक्यांचा जास्त वापर प्रदूषणाला आणखीन दूषित करत आहे. त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत आहे. फटाक्यांमुळे तयार होणाऱ्या धुराचा आपल्या डोळ्यांना त्रास होण्याची दाट शक्यता असते. हा धूर आपल्या डोळ्यांमध्ये जाऊन आपल्या डोळ्यांचे आरोग्याला तडा देतो आणि आपले डोळ्यांचे आरोग्य विस्कळीत होते. जर तुमच्या डोळ्यांना या गोष्टीचा त्रास होत असेल तर काही टिप्स आहेत ज्यांचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याचा बचाव करू शकता.
अशा परिस्थितीत जर डोळ्यांमध्ये जलन होत असेल. तर सर्वप्रथम आपल्या हात धुवावे. बिन धुतलेल्या हाताने कधीच डोळ्यांना स्पर्श करू नये. फटाक्यांमधून निघणारे रसायन आपल्या डोळ्यांमध्ये अजून पसरले जातील आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतील. त्यामुळे अशा परिस्थितीत हात धुवावे मगच त्यांचा स्पर्श डोळ्यांना करावा. परंतु डोळे न चोळता किंवा तेथे बर्फ न शेकवता आपण डोळ्यांच्या आरोग्य वाचवू शकतो. थंड पाण्याने डोळ्यांना धुणे कधीही योग्य आणि उत्तम ठरेल.
हे देखील वाचा : शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे ‘हे’ गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक
जरा डोळ्यांना या परिस्थितीत जखम झाली असेल तर प्रभावित डोळ्यांना खाजवू नये किंवा चोळू नये. अशा परिस्थितीत डोळ्यांना चोळल्याने जखम आणखीन वाढू शकते तसेच इतर संक्रमणही होऊ शकतात. डोळ्यांना हाताने पकडण्या ऐवजी कॉटनच्या स्वच्छ कपड्याने झाकून ठेवावे ज्याने होणारी जळण कमी होईल. तसेच डोळ्यांना आराम मिळेल. डोळ्यांना जखम लहान असो किंवा मोठी अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही योग्य ठरते. काहीही गोष्ट करण्या पहिला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.