Mumbai cardiac surgery
मुंबई, प्रतिनिधी. माेठ्या जखमेची भीती, दीर्घ रुग्णालयीन मुक्काम अशी हदयविकाराच्या शस्त्रक्रियेमधील भीती आजही कायम आहे. मात्र मिनिमली इन्व्हेिसव्ह कार्डियाक सर्जरी (एमआयसीएस) या प्रगत तंत्रज्ञानामुळे छाेटी चीर व लवकरात लवकर आराम मिळत आहे. याच अत्याधुनिक तंत्राने मुलुंड येथील उपासनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डाॅ. अरविंद गहलाेत यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण नरेंद्र देवस्थळी (६६) यांच्यावर पाच ग्राफ्टची ‘टोटल आर्टिरियल मिनिमल इनवेसिव्ह कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया’ यशस्वी झाली आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आराेग्य व्यवस्थेतील एक महत्वाचा टप्पा मानला जाताे.
डाॅ. अरविंद गहलाेत यांनी पारंपारिक स्टर्नोटॉमीद्वारे छाती न उघडता, प्रगत तंत्रांचा वापर करून पूर्ण ‘रिव्हॅस्क्युलायझेशन’ हे साध्य केले आहे. डाव्या बाजूची अंतर्गत धमनी आणि डाव्या रेडियल धमनी पासून ‘वाय’ ग्राफ्टचा वापर करून, एलएडी , डायगोनल, ऑब्ट्यूस मार्जिनल, पोस्टरोलेटरल वेंट्रिकुलर शाखा आणि पोस्टिरीअर डिसेंडिंग धमनीमध्ये ग्राफ्ट्स बसविण्यात आले.
‘मिनिमल इनवेसिव्ह’ शस्त्रक्रियेत पाच ग्राफ्ट यशस्वीपणे बसविण्याची पहिलीच वेळ
मुंबईत ‘मिनिमल इनवेसिव्ह’ पाच ग्राफ्ट यशस्वीपणे बसवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डाॅ. अरविंद गहलाेत यांचे म्हणणे आहे. ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक हृदय शस्त्रक्रियेतील वाढत्या कौशल्याला अधोरेखित करते. तसेच, ही पद्धत गुंतागुंतीच्या बायपास प्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी जलद पुनर्प्राप्ती आणि कमी गुंतागुंतीची असल्याचे रुग्णाला लवकरात लवकर आराम मिळतो.
“मिनिमल इनवेसिव्ह पद्धतीद्वारे पाच ग्राफ्ट करणे ही महत्त्वाची कामगिरी आहे. यात रुग्णांची काळजी, सर्जिकल नवकल्पना पुढे नेण्यासाठी तसेच रुग्णांना नव जीवन देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो असे कार्डियाक सर्जन डाॅ. अरविंद गहलाेत सांगतात.
ईमेल: drarvind1080@gmail.com






