(फोटो सौजन्य: istock)
अनहेल्दी जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोक मधुमेहाच्या आजाराला बळी पडत असतात. हा एक गंभीर आजार आहे. आजकाल तर मधुमेहाचा धोका इतका वाढला आहे की, मोठेच काय तर लहानही याला बळी पडत आहेत. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे महत्त्वाचे ठरते. मधुमेह झाल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात न ठेवल्यास शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते. मधुमेह हा एक असा आजार आहे जो मुळापासून नष्ट करता येत नाही. औषधे, आहार आणि जीवनशैली बदलून यावर नियंत्रण ठेवता येते.
जर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल तर तुम्ही काही भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. या भाज्यांमध्ये फायबर आणि खनिजांसह अनेक पोषक घटक असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. औषधांसोबतच तुमच्या आहारात आणि जीवनशैलीतही काही बदल करणे गरजेचे आहे, असे केल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
महागडे गिफ्ट्सच नाही तर ‘या’ सोप्या गोष्टींनीही बायकोला करता येईल खुश, नात्यातील प्रेम आणखीन वाढेल
कारले
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे कारलं. हे चवीला कडू असलं तरी तुमच्या आरोग्यासाठी फार फायद्याच ठरू शकत. कारल्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर आढळतात. तज्ज्ञांच्या मते, कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी आढळतो ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करता येते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज कारल्याचे सेवन करावे. तुम्ही कारल्याचा रस, कारल्याची करी किंवा कारल्याची भाजी बनवून त्याचे सेवन करू शकता. कारल्याचा रस रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरू शकते.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये क्रोमियम आणि फायबर आढळतात जे पचनसंस्था मजबूत करतात. ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. ब्रोकोली तुम्ही सॅलड, स्मूदीच्या किंवा भाजीच्या स्वरूपात खाल्ली जाऊ शकते. संध्याकाळच्या स्नॅकच्या वेळी तुम्ही ब्रोकोली सॅलड अथवा सूप तयार करून त्याचे सेवन करू शकता.
दुधी
उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांसाठी दुधी फायदेशीर भाजी ठरू शकते. दुधीमध्ये फायबर आढळते जे साखरेची पातळी नियंत्रित करू शकते. तुम्ही भाजी, सूप, रायता किंवा ज्यूसच्या स्वरूपात याचे सेवन करू शकता. यापासून टेस्टी असा शिरा देखील बनवला जाऊ शकतो.
पालक
पालक ही एक अशी भाजी आहे जी आपल्या आरोग्यसाठी फार फायदेशीर ठरत असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पालकाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पालकाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही. तुम्ही तुमच्या आहारात पालकाची भाजी, सूप किंवा स्मूदीच्या स्वरूपात याचा समावेश करू शकता.
भोपळा
अनेकांना न आवडणाऱ्या भोपळ्यामध्ये फायबर, झिंक आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक असतात. भोपळ्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत राहते ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही भोपळा खाऊ शकता. तुम्ही यापासून भोपळ्याची भाजी, घारघे, किंवा सूप बनवून याचे सेवन करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.