नवी दिल्ली : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनतर त्यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. आज शिंदे गटाची ऑनलाईन बैठक (Online meeting) पार पडली या बैठकीला शिवसेनेतील 14 खासदारांनी (14 MP Attend) हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नाराज 12 खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. (Press conference in Delhi tomorrow) या खासदारांमध्ये हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे, धैयशील माने, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, प्रताप जाधव यांच्यासह चौदा खासदार उद्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
[read_also content=”शिंदे गटाकडून कार्यकारिणी जाहीर, ‘या’ नेत्यांना मिळाले कार्यकारणीत स्थान https://www.navarashtra.com/maharashtra/executive-announced-by-shinde-group-these-leaders-got-position-in-executive-305572.html”]
दरम्यान, हे सर्व खासदार पक्षातील घुसमट आणि नाराजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत. शिंदे गटातील नव्या कार्यकारणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख असतील. नव्या कार्यकारणीमुळं शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे. उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतून ज्यांना दूर केले त्यांनाच नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी स्थान देण्यात आलं आहे. तसेच कामाची जबाबदारी सुद्धा देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.