दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टी होऊन एक आठवडा झाला मात्र अजूनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाला होता. मात्र, आता सरकारने अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 146 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अवकाळी पावसाने राज्यात कहर केल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे आणि सांगलीमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच शासनाकडून मिळालेल्या फक्त दोन रुपये तीस पैशांच्या नुकसानभरपाईमुळे पालघरमधील शेतकरी संतप्त झाले आहेत.
याशिवाय, मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. भोपाळ, इंदूर आणि उज्जैन येथेही जोरदार वारे वाहत होते. गुरुवारी सकाळी जयपूर, अलवर आणि करौलीसह राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस…
सततच्या पावसामुळे रायगडच्या कर्जत तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
आता थोड्याशा वादळी पावसाने ही माती बसेल. पण पुन्हा धुरळाच पाहायला मिळणार आहे. अमावास्येच्या तोंडावर पाऊस लागेल, अशी शक्यता होती. पण आता वादळी पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागात अलिकडच्या काळात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे या प्रदेशात हिवाळा आला आहे. तिन्ही भागात तापमानातही घट झाली आहे.
चेन्नईतील जलाशयातील पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानंतर तीन प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागात बुधवारी सकाळी हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये देखील ऊन पाऊस आणि थंडीचा खेळ सुरूच आहे.
सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हिणी घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पाऊस पडला आहे. १ जून ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ९४७१ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले असून, ही देशातील सर्वाधिक नोंद आहे.
याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली.
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.