भारत पाकिस्तान (India Pakistan)या दोन्ही देशांनी हिंदू मुस्लिमांचा वाद आणि त्यातून घडलेले अनुचित प्रकार पाहिलेले आहेत. अशीच एक घटना पाकिस्तानातील एका हिंदू व्यक्ती सोबत घडली असून तेथील मुस्लिमांनी त्याच्या घराला घेराव घालत त्याला ठार मारण्याची तयारी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Earlier, a charged mob gathered around the apartment building to get hold of the Hindu man. Police dispersed the mob and arrested the victim. pic.twitter.com/3j0RHUzzHO — Naila Inayat (@nailainayat) August 21, 2022
पाकिस्तानात अशोक कुमार नावाच्या एका हिंदू सफाई कामगारावर तथाकथित ईश्वरनिंदेचा आरोप करण्यात आला. तेव्हा या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली आणि पाकिस्तानातील हैदराबादमधील त्याच्या घरावर पाकिस्तानातील मुसलमानांनी घेराव घातला होता. अशोक कुमारला पकडण्यासाठी त्याचे घर असलेल्या इमारतीभोवती शेकडो लोकांचा जमाव जमला होता. सर्वजण अशोकला खाली उतरण्यास सांगत होते पण अशोकने आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांची वाट धरली. मात्र, काही वेळाने पोलिस आले आणि त्यांना जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
मुबशीर झैदी नावाच्या पत्रकाराने ट्विट केले की, हैदराबाद पोलिसांनी ईशनिंदेचा आरोप करणाऱ्या हिंदू सफाई कामगाराला ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या हिंसक जमावाला पांगवले. स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादातून स्वच्छता कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
Hyderabad police dispersed a violent mob which was demanding handing over a Hindu sanitary worker accusing him of #blasphemy Police claims the sanitary worker was targeted because of a personal clash with a local resident pic.twitter.com/CnSFLNLqhH — Mubashir Zaidi (@Xadeejournalist) August 21, 2022
पाकिस्तानी पत्रकार आणि स्तंभलेखक नाइला इनायत यांनी ट्विटरवर ट्विट केले की, कुराणच्या कथित अपमानाबद्दल हैदराबादमध्ये हिंदू सफाई कर्मचारी अशोक कुमार यांच्यावर ईशनिंदा २९५ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोप दुकानदार बिलाल अब्बासी यांच्याशी झालेल्या वादानंतर झाला आहे, ज्याने नंतर कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली. तत्पूर्वी, हिंदू व्यक्तीला पकडण्यासाठी अपार्टमेंट इमारतीभोवती आरोपी जमाव जमला होता. पोलिसांनी जमावाला पांगवले आणि अशोक कुमारला अटक केली आहे.