४०० पारचा संकल्प अवघड पूर्ण करणे अवघड; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपच्या नेत्याचे पत्र, पत्रातून व्यक्त केली नाराजी

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Loksabha Election) कानपूर लोकसभा (Kanpur Loksabha) जागेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

  लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Loksabha Election) कानपूर लोकसभा (Kanpur Loksabha) जागेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. भाजपकडून (BJP ) कानपूरच्या जागेवर नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश अवस्थी यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चांगलेच चर्चेत आहेत.

  सध्या भाजपमध्ये अनेक नवीन कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावर आता कानपूरमधील भाजपचे माजी उपाध्यक्ष, विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, दिग्गज नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहत उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे, ४०० पारचा संकल्प पूर्ण करणे कठीण आहे.

  प्रकाश शर्मा कोण आहेत?

  प्रकाश शर्मा यांचे नाव कानपूरमधील दिग्गज नेत्यांच्या यादीमध्ये आहे. त्यांनी आत्तापर्यंत भाजप, विहिंप, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शहरातील राजकारणासोबत त्यांना राज्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कानपूरमधून रमेश अवस्थी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रकाश शर्मा यांनी यावर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

  प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

  कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे. या भूमीवरून जनसंघ आणि भाजपसाठी मैदान तयार झाले आहे. इथं पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाही. रमेश अवस्थी यांनी भाजपचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी त्यांनी काय योगदान दिले याची माहिती कार्यकर्त्यांना सुद्धा नाही. कानपूरची भूमी कार्यकर्त्यांविना झाली आहे का? पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून ते अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. असेच चालू राहिले तर तुमचा ४०० पारचा संकल्प अपूर्णच राहील. कानपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रमेश अवस्थी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.