‘भारत जोडो न्याय यात्रे’नंतर काँग्रेसला मोठा झटका; दीडशेपेक्षा जास्त नेते भाजपात दाखल

आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर गुवाहाटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टुडेंट्स युनियनच्या (एएएसयू) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    दिसपूर : आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर गुवाहाटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टुडेंट्स युनियनच्या (एएएसयू) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री बिस्मिता गोगोई, माजी विधानसभा अध्यक्ष जीबा कांता गोगोई यांची मुलगी, आसाम प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष अंजन दत्ता यांची मुलगी अंगकिता दत्ता आणि एएएसयूचे माजी अध्यक्ष दीपांका कुमार नाथ यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

    महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर ते गुजरात भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून गेल्यानंतर या नेत्यांनी काँग्रेसला ‘टाटा-बायबाय’ केला आहे.

    राहुल यांच्या यात्रेचा मोठा प्रभाव

    मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यांनी एक्सवर लिहिले की, मला हे मानावे लागेल की राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आसाममध्ये मोठा प्रभाव पडला आहे.