श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशीच (फोटो- सोशल मीडिया/@ManishKasyapsob)
अहमदाबाद: काल अहमदाबादच्या मेघानीनगर येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सुरू झाला आहे. तपासातून हा अपघात कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. दरम्यान 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. मात्र सुदैवाने एकच प्रवासी यातून सुखरूप बचावला आहे. त्याचसोबत आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ श्रीमद्भगवद्गीते संदर्भात आहे.
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण व्हिडिओ समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ श्रीमद्भगवद्गीतेशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
विमान अपघातामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघाताच्या ठिकाणी श्रीमद्भगवद्गीता सापडली आहे. त्याचा देखील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओचे विशेष असे म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे एकही पान त्यात खराब झालेले किंवा जळलेले नाहीये. हा व्हिडिओ पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे हा चमत्कार म्हणावा की अजून काही अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
विमान में एक यात्री भागवत गीता लेकर सफर कर रहे थे
भगवत गीता बिल्कुल सही सलामत प्लेन के मलबे में मिला है#AhmedabadPlaneCrash #Gujarat #GujaratPlaneCrash #AirIndiaPlaneCrash
#AirIndiaFlightCrashManaged By – Team pic.twitter.com/Jo0iW352jy
— Manish Kasyap Son Of Bihar (@ManishKasyapsob) June 13, 2025
काल म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये मेघानीनगर येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. मात्र या विमानाच्या ढीगाऱ्यात श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ सापडला आहे. विशेष म्हणजे जशीच्या तशी राहिल्याचे दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये एक माणूस श्रीमद्भगवद्गीतेची पाने दाखवत आहेत. यामध्ये श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशी असल्याचे तो सांगत आहे. एवढा मोठा अपघात होऊनही श्रीमद्भगवद्गीतेचे एकही पान जळलेले नाहीये.
‘त्या’ १० मिनिटांमुळे सुखरूप, भूमीने सांगितली कहाणी
भूमी चौहान या अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमधून प्रवास करणार होत्या. मात्र त्यांना एअरपोर्टवर 10 मिनिटे उशीर झाला आणि त्या या मोठ्या घटनेतून सुखरूप वाचल्या आहेत. भूमी चौहान या एअर इंडियाच्या विमानातून अहमदाबादवरुण लंडनला जाणार होत्या. मात्र ती विमानाच्या वेळेत पोहोचू शकली नाही.
याबाबत भूमी चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मला वाटेत ट्रॅफिक लागल्याने विमानतळावर पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे मला विमानात चढू देण्यात आले नाही.” मात्र आता जीव वाचल्याने तिने देवाचे आभारच मानले आहेत. मी सुरक्षित आहे मात्र घडलेला अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे.
एअर इंडियाच्या अपघात झालेल्या AI 171 या विमानामधून विश्वास कुमार रमेश हे देखील प्रवास करत होते. ते विमानातील 11 A या जागेवर बसले होते. ३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी २४१ प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश बचावले.