एअर इंडिया नव्या लुकमध्ये, बदलती शैली, कर्मचाऱ्यांचे गणवेश प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या हाती डिझाईन

एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या गणवेश पण बदलला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी हा गणवेश तयार केला आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत करार करण्यात आला होता.

    एअर इंडियाचा नवा लुक : टाटा सन्सच्या ताफ्यामध्ये आल्यापासून एअर इंडिया भरारी घेत आहे. आता सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजेच एअर इंडियाचा लूकची (Air India Look). नुकतीच एअरलाईनने आता विमानाची पहिली झलक समाज माध्यमांवर शेअर केली आहे. या नव्या लुकची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर शेअर केलेल्या नव्या पोस्टवर लाईक्स आणि कमंटेचा वर्षाव सुरु आहे. एअरलाईनने ए ३५० विमानाचं ताजं छायचित्र शेअर केलं आहे. हे विमान फ्रान्सच्या Toulouse च्या रंगशाळेत (Paint House) उभं आहे. या एअर इंडियाचा लूक एकदम झक्कास आहे.

    विमान फ्रान्सच्या Toulouse च्या रंगशाळेतील कामगिरांनी त्याला नावीन्यतेच्या रंगामध्ये न्हाऊन टाकलं आहे. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हे छायाचित्र शेअर केले आहे. नवीन रंगात न्हाऊन निघालेली ही विमानं हिवाळ्यात भारतात दाखल होणार आहे. एअर इंडियाचा नवा लुक आधुनिक रुप, स्टाईलिश डिझाईन, लाल, पांढरा आणि नारंगी रंगाच्या सरमिसळीने हा नवा लोगो डोळ्याचे पारणे फेडतो. हा लोगो अपिल झाला आहे. तो मनाला भुरळ पडणारा आहे. यापूर्वीच नवीन लोगोच्या रंगात एअरलाईन्सचा शुभंकर महाराजा न्हाऊन निघाला आहे.

    एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या गणवेश पण बदलला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी हा गणवेश तयार केला आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत करार करण्यात आला होता. एअर इंडियाच्या १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याची योजना आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये वैमानिक, विमानातील कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतरांचा समावेश आहे. एअर इंडियाने विमानाची डागडूज आणि देखभालीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी भांडार उघडले आहे. यामध्ये १० लाखांहून अधिक छोटे-मोठे सामान असेल. दिल्ली विमान तळावरील टर्मिनल-३ जवळ जवळपास ५४,००० चौरस मीटरवर विमाना संबंधीत सर्व साहित्याचं भांडार असेल. त्यामुळे अनेक मोठं-मोठ्या दुरुस्तीसाठी विमान हलविण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी सर्वच यंत्रणा तैनात ठेवण्यात येईल.