आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास कोण होणार मुख्यमंत्री? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Delhi Assembly Election Result 2025 : दिल्ली विधानसभेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उद्या दिल्लीची सत्ता कोणाकडे जाणार निकाल येणार आहे. मात्र ही निवडणूक प्रामुख्याने भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात लढली गेली आहे. भाजप आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत होणार आहे. तर कॉँग्रेस आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल. दरम्यान आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर याबाबत ॲक्सिस माय इंडियाने एक सर्व्हे केला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 तारखेला मतदान पार पडले. 60.44 टक्केच मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर मतदानाची टक्केवारी घसरल्यास दिल्लीत सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची चिंता वाढली आहे. त्यातच मतदान झाल्यानंतर समोर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे देखील धक्कादायक आहेत. बरेचसे आकडे हे भाजपची सत्ता येणार असे म्हणत आहेत, तर काही आंकडे हे पुन्हा आप सरकार येईल असे अंदाज वर्तवत आहेत.
जर का दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार आले, तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याबाबतच ॲक्सिस माय इंडियाने एक सर्व्हे केला आहे. त्यातून त्यांनी आप सरकार आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी योग्य कोण?
दिल्लीत आप सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार आणि यासाठी जनतेची पसंती कोणाला आहे हे जाणून घेऊयात. ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार, दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अनेक वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोल्ल्सनुसार दिल्लीत भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. मात्र आप सरकार आल्यास अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचे समोर आले आहे. दिल्लीकरांनी पहिली पसंती अरविंद केजरीवाल यांना दिली आहे. 33 टक्के जनतेने केजरीवाल यांना पहिली पसंती दर्शवली आहे.
जर का भाजपचे सरकार आले तर नवी दिल्ली येथून निवडणूक लढवणारे प्रवेश वर्मा हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत. प्रवेश वर्मा यांच्या नावाला 13 टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर खासदार मनोज तिवारी यांना 12 टक्के पसंती देण्यात आली आहे.
सध्या आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. मात्र जनतेने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास असहमती दर्शवली आहे. केवळ दिल्लीच्या 3 टक्के जनतेने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे जर का उद्या दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आले, तर अरविंद केजरीवाल हेच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. मात्र पक्षाचा अधिकृत निर्णय आल्यावर हे स्पष्ट होईलच.
आम आदमी पक्षाचा जाहीरनामा
आम आदमी पक्षाने निवडून आल्यास युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी अनेक योजना, पिण्याचे पाणी अशा अनेक गोष्टी जाहीरनाम्यात मांडली आहेत.
1. महिलांना मासिक २५०० रुपये मानधन आणि जातीय जनगणना व नोकरी
2. ट्रान्सजेंडर समाजासाठी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण
3. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज
4. दिल्लीच्या सर्व जनतेसाठी २५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य कव्हरेज
5. बेरोजगार तरुणांना ८ हजार ५०० रुपये स्टायपेंड
6. कुटुंबाला ५०० रुपये प्रति सिलिंडर दराने स्वयंपाकाचा गॅस
7. पेन्शन योजना
8. 24 तास वीज आणि पुरवठा देणे
जर पुन्हा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यास अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री हे जवळपास नक्की आहे. मात्र पुन्हा आप सरकार दिल्लीत आल्यास वरील दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यवर असणार आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास पुन्हा एकदा भाजप व त्यांच्याध्ये संघर्ष वाढू शकतो. 24 तास पाणी आणि वीज हा मुद्दा गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी सत्तेत असूनही पूर्णपणे सोडवलेला नाही. तर दिल्लीतील दारू घोटाळा, प्रदूषित यमुना नदी, केंद्र आणि राज्यात योग संवाद राखणे अशा अजेंडयावर काम करावे लागणार आहे.
भाजपचा जाहीरनामा काय ?
गरजू विद्यार्थ्याना पीजी ते केजीपर्यंत मोफत शिक्षण
आप सरकारच्या कुशासन आणि भ्रष्टाचाराविरुद्ध झीरो टॉलेरेन्स धोरण तयार करून एसआयटी स्थापन केली जाईल.
ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ
ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन
७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार
महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये
घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन
गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी देण्याचे वचन
तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत