बांगलादेशात हिंदूंच्या मॉब लिंचिंगवर काँग्रेस संतप्त; प्रियांका म्हणाल्या- 'सरकारने अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचाराचा मुद्दा...' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Priyanka Gandhi on Bangladesh Hindu man lynched : शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थिती आता मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार पडल्यानंतर तिथे सुरू झालेला हिंदूंवरील अत्याचाराचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. ताज्या घटनेत, मैमनसिंग शहरात एका २५ वर्षीय हिंदू कामगाराला केवळ ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून जमावाने ठेचून मारले आणि त्याचा मृतदेह जाळला. या घटनेने संपूर्ण भारत हादरला असून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारला या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
२५ वर्षीय दिपू चंद्र दास हा एका कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप करत एका उन्मत्त जमावाने त्याला घेरले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून ती बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या असुरक्षिततेचे भयावह प्रतीक बनली आहे. प्रियांका गांधी यांनी ही बातमी “अत्यंत अस्वस्थ करणारी” असल्याचे सांगत याला मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हटले आहे.
“Extremely alarming”: Priyanka Gandhi urges Centre to take cognisance of increasing violence against Hindus in Bangladesh Read @ANI story | https://t.co/y0USa7WEGR#PriyankaGandhi #Centre #Bangladesh #Hindus pic.twitter.com/Xysy0CpqA4 — ANI Digital (@ani_digital) December 19, 2025
credit : social media and Twitter
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “कोणत्याही सुसंस्कृत समाजात धर्म किंवा ओळखीच्या आधारावर हत्या करणे स्वीकारार्ह नाही. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराची गांभीर्याने दखल घ्यावी.” दुसरीकडे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. “एवढ्या गंभीर मुद्द्यावर केंद्र सरकार मूक प्रेक्षक म्हणून का बसले आहे?” असा सवाल त्यांनी केला. भारताचे हे मौन बाह्य शक्तींना बळ देत असून, सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेपाद्वारे तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी गेहलोत यांनी केली आहे.
बांग्लादेश में हिंदू युवक दीपू चंद्र दास की भीड़ द्वारा बर्बरतापूर्ण हत्या का समाचार अत्यंत चिंताजनक है। किसी भी सभ्य समाज में धर्म, जाति, पहचान आदि के आधार पर भेदभाव, हिंसा और हत्या मानवता के खिलाफ अपराध है। भारत सरकार को पड़ोसी देश में हिंदू, ईसाई और बौद्ध अल्पसंख्यकों के… — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 19, 2025
credit : social media and Twitter
ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येला सतत लक्ष्य केले जात आहे. घरांची जाळपोळ, मंदिरांची तोडफोड आणि आता थेट ‘मॉब लिंचिंग’ सारख्या घटनांनी तिथल्या अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या घटनेचा निषेध केला असला आणि “गुन्हेगारांना सोडणार नाही” असे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात हिंसाचार थांबताना दिसत नाहीये. बांगलादेशातील हिंदूंची परिस्थिती आता केवळ त्या देशाचा अंतर्गत मुद्दा राहिलेला नाही. भारतासाठी ही चिंतेची बाब असून, प्रियांका गांधी आणि काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न मोदी सरकारसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवणारे ठरत आहेत. आता केंद्र सरकार यावर काय ठोस कृती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: मैमनसिंग येथील २५ वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदू तरुणावर ईशनिंदेचा (Blasphemy) खोटा आरोप करून जमावाने त्याची 'मॉब लिंचिंग'द्वारे हत्या केली.
Ans: भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा बांगलादेश सरकारकडे जोरदारपणे आणि तातडीने मांडावा, अशी मागणी केली आहे.
Ans: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या हत्येचा निषेध केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.






