कोलकाता हायकोर्टाची संघाच्या सभेला परवानगी (फोटो- सोशल मिडिया/istockphoto)
कोलकाता: कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला मोठा धक्का दिला आहे. कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील वर्धमान या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे. 16 फेब्रुवारी रोजी बंगालच्या वर्धमान या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक सभा होणार आहे. या सभेला कोलकाता हायकोर्टाने परवानगी दिली आहे. संघाच्या या सभेला पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
16 फेब्रुवारी रोजी वर्धमान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला पंचिम बंगाल पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यानंतर कोलकाता हायकोर्टाने संघाला बैठक घेण्यास परवानगी दिली आहे. हायकोर्टाने बंगाल पोलिसांनी नाकारलेली परवानगीकहा निर्णय रद्द करत परवानगी दिली आहे.
वर्धमान या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. कोलकाता हायकोर्टाने परवानगी देताना काही सूचना देखील केल्या आहेत. ज्या भागात ही सभा होणार आहे त्या ठिकाणी ही सभा शांततेत पार पाडावी, त्यासाठी योग्य नियोजन केले जावे अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. आवाजाची मर्यादा देखील कमी ठेवावी.
16 तारखेची सभा जवळपास 1 ते दीड तास इतक्या कालावाढीची असल्याने कोणतीही अडचण निर्माण होईल अशी शक्यता वाटत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे या सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे. सभा झाल्यानंतर मोहन भागवत हे कोलकाता आणि वर्धमान या भागातील संघ स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मोहन भागवतांना अटक करण्यात आली असती- राहुल गांधी
“…तर मोहन भागवतांना अटक करण्यात आली असती”; राहुल गांधी नेमकं म्हणाले तरी काय?
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने आपले नवीन मुख्यालय उभारले आहे. कॉंग्रेसच्या या नवीन कार्यालयाचे नाव इंदिरा भवन असे असणार आहे. खासदार सोनिया गांधी यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांनी इंदिरा भवनच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये संवाद साधला. यावेळी राहुल गांधी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा देखील उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही, असे मत खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.