‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सकडून उमेदवार जाहीर; ‘इंडिया’ आघाडीत गोंधळ

नॅशनल कॉन्फरन्सने पक्षाचे ज्येष्ठ नेते मियां अल्ताफ अहमद लाहरवी यांना अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, जो नॅशनल कॉन्फरन्सच्या इंडिया आघाडीच्या भागीदार आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचा गृह मतदारसंघ आहे.

    जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सने पक्षाचे ज्येष्ठ नेते मियां अल्ताफ अहमद लाहरवी यांना अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, जो नॅशनल कॉन्फरन्सच्या इंडिया आघाडीच्या भागीदार आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचा गृह मतदारसंघ आहे.

    2014 मध्ये अनंतनागमधून विजयी झालेल्या मेहबूबा आणि त्यांचे वडील व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद या दोघांनीही संसदेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लाहरवी हे मध्य काश्मीरमधील कंगनचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

    उमेदवारीची घोषणा करताना ओमर म्हणाले, ‘अनंतनाग-राजौरी जागेसाठी मियांसाहेबांपेक्षा चांगला उमेदवार नाही. लोक त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीशी परिचित आहेत. त्यांनी कधीही धर्म किंवा जातीच्या आधारावर मते मागितली नाहीत, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे’.

    नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा लढवू इच्छित आहेत आणि त्यावर ठाम राहण्याच्या निर्णयामुळे खोऱ्यातील राजकीय पक्षांची युती असलेल्या ‘पीपल्स अलायन्स फॉर द गुपकर डिक्लेरेशन’वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वी अनंतनाग संसदीय जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या य मतदारसंघाचे लोकसभेत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी न्यायमूर्ती (निवृत्त) हसनैन मसूदी यांनी प्रतिनिधित्व केले होते.

    2019 मध्ये त्यांनी 32 टक्के मते मिळविली आणि काँग्रेसच्या जी. ए. मीर यांचा 6 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. 30 हजारांपेक्षा थोडी जास्त मते मिळाल्यानंतर मुफ्ती तिसऱ्या स्थानावर होत्या.