फोटो सैजन्य - सोशल मीडिया
Prateek Yadav death:समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे आज बुधवारी सकाळी लखनौमध्ये निधन झाले. ते अवघ्या ३८ वर्षांचे होते. सकाळी यादव कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पण त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे. ही बातमी समोर येताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
प्रतीक यादव यांचा जन्म एका मोठ्या राजकीय कुटुंबात झाला होता. ते अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ होते. पण त्यांनी राजकारणात प्रवेश न करता व्यवसायिक जगतात आणि फिटनेसच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रतीक रियल इस्टेट व्यवसायाशी संबंधित होते. त्यांच्या हाय प्रोफाइल जीवनशैलीमुळे ते नेहमी चर्चेत असायचे. विशेष म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असूनही त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही.
अनेक लोकांनाही माहित होते की, प्रतीक यादव शिक्षणातही खूप पुढे होते. त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स’मधून (University of Leeds) मधून एमबीएची पदवी संपादन केली होती. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात परतून व्यवसायिक जगतात पाऊल ठेवले. शिक्षण आणि व्यवसायिक या दोन्ही गोष्टीचा समतोल राखणारे प्रतीक एक सुशिक्षित चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांना व्यवसायिक कामात आणि स्वत:चा ब्रँड बनवण्यास मदत झाली.
NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?
प्रतिक हे फक्त व्यवसायिक नव्हते तर ते फिटनेस प्रेमी होते. लखनैमध्ये त्यांनी ‘द फिटनेस प्लॅनेट’ नावाचे जिम सुरू केले होते. तसेच ते ‘जीव आश्रय’ सारख्या उपक्रमांशी जोडलेले होते, जिथे बेवारस प्राण्यांची काळजी, उपचार आणि बचाव कार्याचे काम सुरू असते. २०११ मध्ये त्यांचा विवाह अपर्णा यादव यांच्याशी झाला होता. गेल्या काही महिन्यातच ते त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे चर्चेमध्ये राहिले होते. पण आता त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.






