नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी (Politics) घडताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर विविध प्रकरणांवरून टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट करत यावर भाष्य केले. त्यात त्यांनी ‘मोदानी’शी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण रहस्ये सातत्याने बाहेर येत असल्याचे म्हटले आहे.
मोदानी से जुड़े राज लगातार बाहर आ रहे हैं।
शिंदे सरकार ने धारावी परियोजना का टेंडर अडानी को देने के लिए फिर से बोली लगवाई। नियम एवं शर्तों में बदलाव करके टेंडर के पिछले विजेता को बाहर किया और नकदी संकट से जूझ रहे अडानी ग्रुप के लिए भुगतान को आसान बनाया।
इस मामले पर हमारा बयान। pic.twitter.com/b1AMRke6g6
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 18, 2023
जयराम रमेश यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘मोदानी’शी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण रहस्ये सातत्याने बाहेर येत आहेत. शिंदे सरकारने धारावी प्रकल्पाचे टेंडर अदानीकडे देण्यासाठी पुन्हा बोली लावण्यात आली. तसेच अटी आणि नियमांमध्ये बदल करून टेंडरमधील पूर्वीच्या विजेत्याची हकालपट्टी करण्यात आली. तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या अदानी समूहासाठी सारं काही सोपं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी ट्विट करत भूमिका मांडली.
त्यामध्ये म्हटले की, जेव्हा नोव्हेंबर 2018 मध्ये टेंडर काढण्यात आले तेव्हा दुबईस्थित सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने प्रतिस्पर्धा करणारी कंपनी अदानी इंफ्रास्ट्रक्चरला मागे टाकत 7200 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती.