काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका (फोटो -या ani)
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. काँग्रेसचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर ओबीसी न्याय महासंमेलन सुरु आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही टीका केली आहे. तसेच राहुल गांधी हे दलित आणि मागासवर्गीयांसाठी लढतात असे देखील त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी न्याय महासंमेलनात बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले,:लोकसभा निवडणुकीत आम्ही ३० जागा जिंकलो असतो तर, सत्तेत आलो असतो. जो पंतप्रधान खोटे बोलू शकतो, तो देशाचे भले करू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप विषासारखे आहेत. जर का तुम्ही हे विष चाखले तर तुमचा नाश निश्चित आहे. आपल्याला एक होऊन लढले पाहिजे. हे आपल्याला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
#WATCH | Delhi | Congress President Mallikarjun Kharge says, "…A Prime Minister who speaks lies cannot do good for the country…We must stand united and fight…RSS and BJP are like poison. If you taste this poison, you will be finished. These people will try to divide you,… pic.twitter.com/KKzCgxmlYJ
— ANI (@ANI) July 25, 2025
पुढे बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “या देशाला काँग्रेसने जे दिले आहे, ते कोणी नाकारू शकत नाही. ओबीसी जनगणना होईल हवी असे म्हणण्याची हिंमत केवळ राहुल गांधी यांनी दाखवली. यासाठी आपल्याला राहुल गांधींची साथ द्यायची आहे. राहुल गांधी गरिबांसाठी लढतात. त्यांच्या हक्कासाठी लढा देतात. यासाठी आपण त्यांना साथ द्यायची आहे. त्यांच्या मागे उभे राहायचे आहे.”
“या ओबीसी संमेलनात खूप मोठ्या संख्येने आलात, याचा मला आज आनंद झाला आहे. देशात जातीय जनगणना करणे आणि आरक्षणातील ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी ही आमची महत्वाची मागणी आहे. शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्यांना पंतप्रधान मोदी आरक्षण देऊ इच्छित नाहीत. मात्र आम्ही त्या नागरिकांसोबत आहोत. आपण मागून पण आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला लढाई लढवीत लागणार आहे. जेव्हा ओबीसी लोक निवडून येतील, तेच ओबीसींचा आवाज ऐकला जाईल,”असे काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत High Level बैठक
यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने संघ देशातील प्रत्येक भागात आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मसुलीम धर्मगुरुंमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमधील हरियाणा भवनमध्ये मुस्लिम धमर्गुरूंसोबत बैठक केली आहे.